लॉटरीची तिकीटं न विकल्यानं परेशान होता, स्वतः स्क्रॅच केली अन् बनला 12 कोटीचा मालक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण एक म्हण ऐकलीच असेल की ‘जब ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ कर देता है.’ असेच काही केरळमधील एका व्यक्तीसोबत झाले. ही कहाणी एका 46 वर्षीय व्यक्तीची आहे जो रातोरात करोडपती बनला. वास्तविक, शराफुद्दीन ए (Sharafudeen A) नावाच्या व्यक्तीची काही लॉटरीची तिकिटे विकली गेली नाहीत, जी त्यांनी आपल्याकडे ठेवली. त्यापैकी एका तिकिटाने त्यांना केरळ सरकारच्या ख्रिसमस न्यू इयर बम्पर लॉटरी (Christmas New Year Bumper Lottery) अवॉर्डमध्ये 12 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवून दिले. लॉटरीच्या या एका तिकिटाने रातोरात शराफुद्दीनचे भाग्य बदलले आहे.

शराफुद्दीन गेली 7 वर्षांपासून लॉटरी खरेदी-विक्रीचे काम करतात
केरळ सरकार (Kerala government) च्या ख्रिसमस न्यू इयर बम्पर लॉटरीच्या निकालामध्ये विक्रेते शराफुद्दीन ए कडे उरलेल्या तिकिटांपैकी एका तिकिटाचा नंबर होता आणि त्यांना 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली. आखाती देशांतून परतलेले शराफुद्दीन सहा जणांच्या कुटुंबासमवेत इथल्या छोट्याशा घरात राहत होते. याआधी त्यांनी रियाधमध्ये बरीच छोटी-मोठी कामं केली. त्यानंतर, नऊ वर्षे परदेशात राहिल्यानंतर, 2013 मध्ये ते आपल्या देशात परत आले. तेव्हापासून ते लॉटरी विक्री आणि खरेदी करण्याचे काम करू लागले.

शराफुद्दीन जिंकलेली रक्कम कशी खर्च करतील
Newsd च्या वृत्तानुसार, तामिळनाडू राज्याच्या सीमेवर केरळच्या कोल्लम जिल्ह्या (Kollam District) त अर्यानकवु जवळ एरीविधर्मपुरम (Eravidharmapuram) मध्ये एका शासकीय जमिनीवर असणाऱ्या छोट्याशा घरात राहणारे शरीफुद्दीन 2013 मध्ये आखाती देशातील रियाधहून परतले होते. लॉटरी जिंकल्यानंतर शराफुद्दीन यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की मला स्वतःचे घर बांधायचे आहे. लॉटरीतून जिंकलेल्या पैशांनी मी पहिल्यांदा माझे संपूर्ण कर्ज परत करेल आणि एक छोटासा व्यवसाय सुरू करेल. त्यांच्या परिवारात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा परवेझ यांचा समावेश आहे. परवेझ दहावीत शिकतो.

सर्व प्रकारच्या कर कपातीनंतर 7.5 कोटी रुपयांचे मालक होतील
लॉटरीतील विजेत्यास 30 टक्के कर व 10 टक्के एजंट कमिशन वजा केल्यानंतर बाकीची उर्वरित रक्कम देण्यात येईल. म्हणजेच 30 टक्के कर कपात आणि 10 टक्के एजंट कमिशननंतर शराफुद्दीनला सुमारे 7.50 कोटी रुपये मिळतील. केरळ सरकारच्या ख्रिसमस न्यू इयर बम्बर लॉटरी कोड बीआर -77 चा निकाल 17 जानेवारी 2021 रोजी जाहीर झाला होता. पहिले पारितोषिक 12 कोटी रुपये, दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे बक्षीस अनुक्रमे 50 लाख रुपये, 10 लाख, पाच लाख रुपये आणि एक लाख रुपये असे होते.