केरळात ABVP च्या विद्यार्थ्याला मारहाण, 2 संघटना ‘आमने-सामने’ (व्हिडीओ)

थ्रिसूर : वृत्तसंस्था – केरळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. आज केरळातील एका महाविद्यालयात एबीव्हीपीच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांला एसएफआय संघटनेच्या विद्यार्थी कार्यर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे.

केरळातील थ्रिसूर येथील श्री केरळा वर्मा महाविद्यालयात ही घटना घडली आहे. स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर महाविद्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या मारहाणीच्या निषेधार्थ आज बंदचे आवाहन केले आहे. तत्पूर्वी आज सकाळी एसएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना एबीव्हीपीच्या कार्यर्त्यांनी मारहाण केल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनामध्ये विद्याथ्र्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच भाजपा आणि संघाशी संबंधीत असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/