साजनचा विक्रमी सूर

जकार्ता :

जकार्तामध्ये सुरू असणार्‍या आशियाई खेळांमध्ये साजन प्रकाश या भारतीय जलतरणपटूने उत्तम खेळ केला. १९८६मध्ये खजान सिंगनंतर २०० मी. बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या साजनने भारताची मोहोर उमटवली. १९८६ नंतर आशियाई स्पर्धेत जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच भारतीय आहे. १९८६ साली खजान सिंग यांनी अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेल्या आठ स्पर्धकांमध्ये साजनला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली असली, तरीही त्याचे एकंदर प्रदर्शन सर्वांचेच मन जिंकून गेले.२००मी. बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या साजनने संपूर्ण क्रीडाविश्‍वाचे आणि क्रीडारसिकांचे मन जिंकले आहे.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7fdf27c2-a514-11e8-9b14-37c3a1468352′]
मुख्य म्हणजे, साजनने अतिशय कठीण प्रसंगात आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. केरळमध्ये आलेल्या पुरात आपले कुटुंब अडकल्यामुळे सध्या त्याचे संपूर्ण लक्ष तेथेच लागून राहिलेले आहे. इडुक्की येथील साजनच्या कुटुंबातील पाच जण सध्याच्या घडीला बेपत्ता असून, त्यांच्याशी अद्यापही कोणताच संपर्क झाला नसल्याचे कळत आहे.