केरळचे CM विजयन यांची कन्या वीणा अडकली DFI च्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहम्मद रियाझ यांच्याशी विवाहबंधनात

केरळ : वृत्तसंस्था – केरळ चे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा आणि डेमोक्रॅटीक फेडरेशन ऑफ इंडिया (DFI)च्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहम्मद रियाझ हे आज विवाहबंधनात अडकले आहेत. वीणा सॉफ्टवेअर इंजिनियर असून बंगळुरूमध्ये त्यांची स्वत:ची कंपनी आहे. अलीकडेच त्यांचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली होती. यानंतर आता आज (सोमवार दि 15 जून 2020) वीणा आणि मेहम्मद तिरूवनंतपुरममध्ये विवाहबद्ध झाले आहेत.

या विवाहाची खास बात अशी की, वीणा आणि मोहम्मद रियाझ या दोघांचाही यापूर्वी विवाह झाला आहे. मोहम्मद 40 वर्षांचे आहेत तर वीणा 44 वर्षांच्या आहेत. वीणा एका मुलाची आई होणार आहे तर मोहम्मद हे दोन मुलांचे बाप आहेत. काही दिवसांपूर्वीच यांच्या लग्नाबद्दलची माहिती समोर आली होती. वीणा आणि मोहम्मद गेल्या 5 वर्षांपासून घटस्फोटीत आहेत. खास बात अशी की, हे दोघेही एकमेकांना चांगलं ओळखतात.

मोहम्मद यांनी 2009 साली लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस एम के राघवन यांनी त्यांचा पराभव केला होता. मोहम्मद यांचा जन्म कालिकतमध्ये झाला आहे. त्यांचे वडिल पीएम अब्दुल कादर हे एक सनदी अधिकारी होते. कॉलेजात असतानाच मोहम्मद यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 2017 साली ते डेमोक्रॅटीक फेडरेशन ऑप इंडियाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले.