चोराला पकडणाऱ्या त्या पोलिसाला चक्क केरळचे हनीमून पॅकेज!

बेंगळूरू: वृत्तसंस्था

एखाद्या पोलिसाने जर चोराला पकडले तर त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शाबासकी किंवा बक्षिस मिळते. मात्र बेंगळूरातील एका काॅन्स्टेबलने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना चक्क केरळचे हनीमून पॅकेज मिळाले असून, त्यात बोट हाऊसमध्ये राहण्याची सुविधा देखील आहे. या अनोख्या बक्षिसामुळे बेंगळूरु पोलीस दलात चांगलेच चैतन्य संचारले आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f98faea-81f7-11e8-a655-bf0c3e343b53′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेंगळूरू शहारात गुरूवारी मध्यरात्री सरजापूरच्या मुख्य मार्गावर पोलीस कर्मचारी के. ई. वेंकटेश बाईकवरून पेट्रोलिंग करत होते. मध्यरात्रीच्या 2.45 वाजण्याच्या सुमारास त्यांना एका व्यक्तीचा अोरडण्याचा आवाज आला. तात्काळ वेंकटेश यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी दोन बाईकवरुन तिघे जण पळून जात होते आणि परिसरातील लोक चोर-चोर म्हणून अोरडत होते. घटनेचे गांभिर्य अोळखत वेंकटेश यांनी चोरांच्या मागे धाव घेतली. तब्बल चार किलोमीटर पळत चोरांचा पाठलाग केला. तिघांपैकी एका चोराला पकडण्यात त्यांना यश आले.

वेंकटेश यांनी पकडलेल्या चोराचे नाव अरूण दयाल असून त्याला बेल्लादुर पोलीस ठाण्यात हजर केले असून, तो आणि त्याचे सहकारी मोबाईल फोन चोरून पळत होते. इतर दोन चोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
[amazon_link asins=’B07DMXTWXK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36660157-81f7-11e8-9168-673c888e7999′]

यामुळे वेंकटेश यांनी दाखवलेल्या शाैर्याबद्दल वरिष्ठांनी फक्त त्यांना काैतूकाची थाप दिली नाही. तर लग्नात भेट म्हणून 10 हजार रुपये रोख रक्कम आणि हनीमूनसाठी पगारी रजा देखील दिली आहे. त्यांना हा पुरस्कार दाखवलेल्या शाैर्यासाठी आणि निष्ठेसाठी दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अब्दुल अमद यांनी म्हटले आहे. वेंकटेस हे 2007 साली एचएएल पोलीस ठाण्यात काॅन्स्टेबल म्हणून सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी टिळकनगर येथे आणि 2017 मध्ये बेल्लांदुर येथे बदली झाली.  या अगोदर जून महिन्यात कॉन्स्टेबल चंद्रकुमार सी यांनी एका साखळी चोराला पकडले होते. तेव्हा डीसीपी रवी डी यांनी रोख रक्कमेसह त्यांना एक महिन्याची सुट्टी बक्षिस म्हणून जाहीर केली होती.