PAK ला धडा शिकविण्यासाठी कमळाचे बटण दाबा, भाजपच्या ‘या’ बडया नेत्याचा अजब तर्क !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भाजपाचे आमदार निवडून आल्यावर पाकिस्तानला धडा शिकविणार आहेत म्हणजे नेमके काय करणार असा प्रश्न ठाणेकरांना सध्या पडला आहे. कारण उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्य यांनी येथील उत्तर भारतीय संघटनेच्या स्नेहसंमेलनात केलेले भाषण होय.

Image result for केशवप्रसाद मोर्य

महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी विविध राज्यातील प्रमुख नेत्यांना भाजपाने महाराष्ट्रात पाठवले आहे. ठाणे येथील मानपाडा भागातील टिळक बँक्वेट येथे उत्तर भारतीय संघटनेने स्रेहसंमेलन आयोजित केले होते. पाकिस्तान विरोधात बोलले की लोकांच्या भावना उद्पित होतात. लोक भावनाशील होतात, हे जाणून महाराष्ट्रातील निवडणुकाही पाकिस्तान, ३७० कलम यावर लढविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

या स्नेहसंमेलनात बोलताना केशवप्रसाद मोर्य यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून वारंवार अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहे. परंतु, त्याला चोख प्रतिउत्तर द्यायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तसे केले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल. तसेच हाच अणुबॉम्ब कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

आता पाकिस्तान, अणुबॉम्ब आणि महाराष्ट्रातील निवडणुका यांचा अर्थाअर्थी काय संबंध असा प्रश्न कोणीही विचारु नये.

Visit : Policenama.com