UPचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, ‘SCमध्ये निर्णय झाला नाही तर राम मंदिरासाठी केंद्र सरकार कायदा बनवेल’

अयोध्या : वृत्तसंस्था – राममंदिर निर्माणाचे सर्व पर्याय संपले तर कायद्याच्या माध्यमातून मंदिर उभारले जाईल , अशी भूमिका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मांडली आहे. अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमि न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाबद्दल विराट संत संम्मेलन मणि रामदास छावनीमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान संत संमेलनाला गेलेले केशव प्रसाद मौर्य यांनी स्वतःला रामभक्त आणि कारसेवक म्हणत राम मंदिराच्या मुद्द्यावर संदेश देण्याचा प्रयत्न केला. केशव प्रसाद मौर्य राममंदिराच्या मुद्द्यावर म्हणाले की , ‘संतांची जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल रामजन्मभूमीतच राम मंदिराचे निर्माण होईल. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. कोर्टाचा निर्णय येईल किंवा सामंजस्यातून काही तोडगा निघेल. जर हे दोन्ही पर्याय असफल झाले तर कायदा बनवून राममंदिराचे निर्माण होईल. जोपर्यंत राममंदिराचा कलशारोहण होणार नाही तोपर्यंत राममंदिराचा विषय चर्चिला जाईल.’

या संत संमेलनात राम मंदिर मुद्द्यावर चर्चा झाली. संतांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या यांच्या शासनकाळातच राम मंदिराचा निर्माण होणार. संतांचं म्हणणं आहे आहे की , सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला नाही तर केंद्र सरकार संसदेत कायदा बनवून राम मंदिराचा निर्माण करेल.

या संत संम्मेलनात जगतगुरू रामभद्राचार्य, शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्यासमवेत देश विदेशातील संत सहभागी झाले होते. संत संम्मेलनात जगतगुरू रामभद्राचार्य म्हणाले की, ‘एक वर्षाच्या आत राममंदिराची उभारणी सुरु करण्यात येईल. माझी भविष्यवाणी कधीच चुकीची ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत मी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील असे मी सांगितले होते असेही ते म्हणाले.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा