Keshav Upadhye | केशव उपाध्ये यांचा खा. सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले – ‘ताई, मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Keshav Upadhye | पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संसदेत मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने (Central Government) कोट्यावधी गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या मुद्द्यावरुन आता भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पलटवार केला आहे.

 

सुप्रिया सुळेंच्या (MP Supriya Sule) या मागणीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये म्हणाले की, ‘सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्रानं अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची, केंद्राच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार (Ajit Pawar) यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू,’ असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे –

केंद्र सरकारने कोट्यावधी गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे. तसेच, सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

 

Web Title :- Keshav Upadhya | bjp targets ncp mp supriya sule on petrol diesel price hike winter session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

Anemia | शरीरात रक्ताची कमतरता? वेगाने रक्त तयार करू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’ (व्हिडीओ)

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

Pritam Kagne | सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे; जाणून घ्या ‘प्रीतम’चा फिल्मी प्रवास