Keshav Upadhyay | हिंदुत्वविरोधी पक्षांच्या कटात सेना फसली, परतीचा मार्गदेखील बंद; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची शिवसेनेवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India) शिष्टमंडळाने काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (Andheri East Assembly By-Election) आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला. यामुळे शिंदे गट आणि भाजपाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. आता भाजपाने यावरून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. मुंबईत एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या आणि रक्तसांडण्याइतक्या टोकापर्यंत संघर्ष झालेल्या लाल बावट्यासोबत शिवसेनेला हातमिळवणी करावी लागली, असे म्हणत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी सेनेवर टीका केली आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला.

 

केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) म्हणाले, हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी राजकीय नेत्यांनी आखला आहे. कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा हा त्या कटाचाच एक भाग असून आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना या कटात पुरती फसली आहे.

 

उपाध्ये म्हणाले, शिवसेनेचा भगवा रंग आता लाल झाला आहे. शिवसेनेने उद्या एमआयएमचा (MIM) पाठिंबा घेतला तरी आश्चर्य वाटायला नको. मुंबईतील कम्युनिस्ट नेते आ. कृष्णा देसाई (Krishna Desai) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर शिवसेनेने मुंबईत पाय रोवले होते. कम्युनिस्टांचा प्रभाव संपविणार्‍या त्याच शिवसेनेवर कम्युनिस्टांचा पाठिंबा घेण्याची वेळ यावी हा काळाने उगवलेला सूड आहे.

ते पुढे म्हणाले की, राजकीय पक्षांना आव्हान देणार्‍या शिवसेनेकडे हिंदुत्वाच्या विचाराची शक्ती असून
ती शक्तीच काढून घेण्याचा एक व्यापक कट या विरोधकांनी रचला.
त्याचाच भाग म्हणून अगोदर उद्धव ठाकरे यांचे गोडवे गायले गेले.
मग त्यांना पाठिंबा देऊन हिंदुत्वापासून दूर ओढले. आता ठाकरेंची शिवसेना या कटात पुरती फसल्याचे स्पष्ट
झाल्यावर याच कटाचा पुढचा अंक म्हणून उद्धव ठाकरेंना सहानुभूती दाखविण्याचा कांगावा सुरू आहे.
आता ठाकरेंची शिवसेना यात पुरती फसल्याचे लक्षात येताच माघारीचे प्रयत्नही करून झाले,
पण त्यामध्ये यश न आल्याने हिंदुत्वविरोधी पक्षांचा फसवा आधार घेऊन तगण्याची धडपड सुरू आहे.

 

केशव उपाध्ये म्हणाले, हिंदुत्व सोडल्यावर शिवसेनेचा भगवा रंग संपला, आणि ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा रंग शिवसेनेने दाखविला.
संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) गेल्यावर सावरकरांवर बोलणे बंद झाले.
आता तर, हिंदुत्वावर न बोलण्याच्या अटीवरच कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला असून ती अट मान्य केली गेल्याची आमची माहिती आहे.
मित्र म्हणविणार्‍या या सहानुभूतीदार पक्षांनी आता ठाकरे यांचे पंख पुरते छाटले असून परतीचा मार्गदेखील बंद केला आहे.

 

Web Title :- Keshav Upadhyay | bjp slams uddhav thackeray saying shivsena got caught in the conspiracy of anti hindutva political parties

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR