×
Homeताज्या बातम्याKeshav Upadhye | 'त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला...

Keshav Upadhye | ‘त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला फरक कळत नाहीे, अमित शाह हे…’

मुंबई : Keshav Upadhye | आता ना बाळासाहेब, ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाहीे. अमित शाह हे गरुड आहेत. किमान तेवढा तरी फरक पाहा, अशी टीका भाजपाचे नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी गोरेगावमधील कालच्या जाहीर सभेत भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? नवीन नाही, शिवाजी महाराजांच्या काळापासून हे सुरू आहे. आम्हाला जमीन दाखवणार आहेत, ही गवताची पाती नाहीत, तलवारीची आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर केली होती. ही टीका भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. यावर आता भाजपाचे नेते एकापाठोपाठ एक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. (Keshav Upadhye)

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…

– शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत 30-40 आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचे असेल तर आताच जा.

– पुढच्या आठवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय.

– अमित शाह यांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्राचीही निवडणूक लावून दाखवा.

– शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झाली आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली.
रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल,
कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाही म्हणून मी शांत राहण्यास सांगितले.

Web Title :- Keshav Upadhye | bjp keshav upadhye slams shivsena uddhav thackeray over amit shah statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News