Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhima Shankar Jyotirlinga) खरे नसल्याचे आसाम सरकारने म्हटले आहे. एवढंच नाहीतर सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Assam CM Himanta Biswa Sharma) यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असलाचा आरोप होत आहे. आसाम सरकारच्या दाव्यावरुन विरोधकांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? असा खोचक सवाल केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे.

 

सुप्रीय सुळे यांनी ट्वीट करुन भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलं काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय..!

 

 

सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?
सुप्रिया सुळे यांच्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

 

सुप्रिया सुळेंनी दाखवला पुरावा
सुळे यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर असल्याचा पुरावा दाखवला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, श्रीमद् आद्य शंकराचार्य (Shrimad Adya Shankaracharya) आपल्या बृहद रत्नाकर स्त्रोतामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.

 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना विनंती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.

 

 

Web Title :- Keshav Upadhye | bjp spokesperson keshav upadhye criticized ncp mp supriya sule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?

Income Tax Raid On Aniruddha Deshpande | पुण्यातील बडे उद्योजक आणि शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरूध्द देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा