Keshav Upadhye | ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता’ – केशव उपाध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Keshav Upadhye | भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ”शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी बोलघेवडेपणाबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना खडसावले होते. 2 वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता घोषणा पुरेत, कामाला लागा, असा जाहीर सल्ला बाळासाहेबांनी जोशी यांना दिला होता. आज बाळासाहेब असते, तर तोच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता.” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, ”सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे यांनी गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वेळ वाया घालवला आहे. पण टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळं कामाला लागा आणि समस्या सोडवा.” असं ते म्हणाले.

पुढे केशव उपाध्ये म्हणाले, ”एसटी संप (ST Strike), मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसींचे राजकीय आरक्षण (Political Reservation of OBC) याबाबत मुख्यमंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत. गेल्या अडीच वर्षांत नाकर्त्या सरकारमुळे महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांत नाचक्की झाली. विकासाची कामे ठप्प झाली. खंडणी वसुली, खून, बलात्कार, भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट मंत्रालयात घुसली.” असं ते म्हणाले.

”मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्याने या कोंबडीला कसे लुटले ते जाधव यांच्या पराक्रमातून जनतेसमोर आलंय. मातोश्रींना 2 कोटी रुपयांची रोकड आणि 50 लाखाचे महागडे घड्याळ भेट देणाऱ्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का ? आता त्यांच्या यशवंत जाधव यांच्या कथित ‘मातोश्री’चीही चौकशी व्हायला हवी. असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

web title : Keshav Upadhye | bjp spokesperson keshav upadhye slams cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा