Keshav Upadhye | ‘आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या…’ टिपू सुलतान नामकरणावरुन भाजपची शिवसेनेवर खरमरीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या टिपू सुलतान (Tipu Sultan) नाव प्रकरणाचे रोज नवनवे अंक पहायला मिळत आहेत. मुंबईमधील एका मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष (Opposition) असलेल्या भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नुकतेच या मुद्यावरुन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपने थेट शिवसेनेवर (Shivsena) खोचक शब्दांत टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

काय म्हणाले केशव उपाध्ये?
ही तर संधीसाधू सेना… काँग्रेसने (Congress) जन्माला घातली, मुस्लिम लीगच्या (Muslim League) मांडीवर बसली, काँग्रेस (ओ) सोबत रमली, काँग्रेस (I) शी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली… आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना! औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) करणं जमत नाही. हिंदुत्व फक्त गप्पांपुरतं राहिलं. 1970 मध्ये मुस्लिम लीग सोबत गेले, आता टीपू सुलतान उद्घघोष करत आहेत, असे ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त करत खरमरीत टीका केली आहे.

काय आहे वाद?
मुंबईतील मालवणी (Malvani) भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचं बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये,
अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
तर भाजपने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे.

 

Web Title :- Keshav Upadhye | bjp vs shivsena cm uddhav thackeray slammed by devendra fadnavis led bjp leader keshav upadhye over tipu sultan naming issue in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

How To Increase Breast Size | ब्रेस्ट साईज वाढवणे आणि त्यास योग्य आकार देण्यासाठी रोज करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

 

Corporator Pramod Bhangire | प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यावतीने मैदानी स्पर्धांचे आयोजन

 

Easy Ways To Reshape Breast | बाळाला स्तनपान दिल्याने बिघडतो ब्रेस्टचा शेप, जाणून घ्या रिशेप करण्याच्या 5 सोप्या पद्धती