Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Keshav Upadhye | सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून (Airbus Project) टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत (Aatmanir Bharbharat) अभियानाची घोषणा केल्यावर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये (Keshav Upadhye)यांनी दिले आहे.

21 हजार कोटी रुपयांचा करार
4 ते 10 टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण 56 सी-294 मालवाहू विमाने घेण्याचा
अत्यंत महत्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
यानुसार एअरबस, टाटा आणि भारतीय वायू दलात तब्बल अडीच अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.
यानुसार एअरबस 16 मालवाहू विमाने ही थेट तयार करुन देणार आहे.
तर उर्वरित 40 मालवाहू विमानांची निर्मिती आता बडोद्यात केली जाणार आहे.

 

Web Title :- Keshav Upadhye | ‘Criticism from a project that went to Gujarat a year ago is an attempt to cover up one’s own sin!’ Criticism by Keshav Upadhyay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड