Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

मुंबई : Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते व पॅनेलिस्ट घोषित केले असून केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांची प्रदेश मुख्य प्रवक्ते (Chief Spokesperson) म्हणून फेरनियुक्ती केली आहे.

 

उपाध्ये हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ भाजपात काम करीत आहेत. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०१४ मध्ये प्रथम त्यांच्या टीममध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्त केली. अभ्यासू वृत्ती, पत्रकारीतेची पार्श्वभूमी आणि पक्की वैचारीक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच छाप पाडली आहे . सर्व मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. (Keshav Upadhye)

 

‘अभाविप’ ची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी पुण्याच्या रानडे इस्ट्यिट्यूट येथून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. दै पुढारी, दै लोकसत्ता, मुंबई तरूण भारत या दैनिकात त्यांनी काम केले. उपाध्ये यांनी वृत्तपत्रे, ब्लॉग, तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारे लेखन तसेच सामाजिक आणि ललित विषयांवर देखील विपुल लेखन केले आहे

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन अभ्यास गटांत त्यांचा समावेश होता.
नक्षल चळवळीचा छ्त्तीसगडच्या विकासावर होणारा विपरित परिणाम यावर २००६ साली
संशोधनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केला.
हा अहवाल प्रबोधिनीने प्रसिद्ध केला.
सोलापूर येथील दंगलीनंतर प्रबोधिनीने पाठवलेल्या सत्यशोधन समितीमध्येही त्यांचा सहभाग होता.

 

Web Title :- Keshav Upadhye | Keshav Upadhyay re-appointed as Bharatiya Janata Party (BJP) chief spokesperson

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा