Keshav Upadhye | ‘वाझे ते खैरे हा महाविकास आघाडीचा खंडणीवसूलीचा प्रवास..;’ भाजप नेते केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवर टीका

0
4462
Keshav Upadhye | waze to khaire vaya anil deshmukh is the true identity of the mahavikas aghadi government bjp spokesperson keshav upadhye
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वाझे आणि खैरे हीच महाविकास आघाडीची खरी ओळख आहे. अशी टीका भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडीवर केली. औरंगाबाद युवासेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे सुपुत्र ऋषिकेश खैरे (Hrishikesh Khaire) हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात बदली करून देण्यासाठी एका व्यक्तिकडून दोन लाख रूपये घेतल्याचे या ऑडिओक्लिपमधून समोर येत आहे. मात्र संबंधित व्यक्तिचे काम न झाल्यामुळे तो व्यक्ति आता ऋषिकेश खैरे यांच्याकडे पैसे परत मागत आहे. यावरून भाजप-शिंदे गटाने (BJP-Shinde) महाविकास आघाडीवर टीका सुरू केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका केली.

टीका केलेला एक व्हिडीओ केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटरवर टाकला आहे. त्यात ते म्हणतात, ‘वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाझेंपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशांची लुटालुट या राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली, त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) काल पुणे येथे आल्या असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती.
यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या.
अहो सुप्रिया सुळे महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्र्यांना तुरूंगात जावं लागलं. काय पध्दतीची खंडणी सुरू होती.
याची उदाहरणे कालही खैरे यांच्या मुलाच्या रूपाने पुढे आली.’ असंही यावेळी बोलताना केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले.

 

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, ‘अगोदर आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय चालत होतं,
याचा विचार करा आणि मग या सरकारवर बोला. या सरकारमध्ये जनतेच्या सेवेसाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत.
सगळ्या चुकीच्या गोष्टी ते मोडून काढत आहेत. पण पुन्हा पुन्हा सिध्द होतंय,
वाझे ते खैरे म्हणजे महाविकास आघाडीचा खंडणी वसुलीचा प्रवास.’
असं म्हणत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर चांगलीच टीका केली.

 

Web Title :- Keshav Upadhye | waze to khaire vaya anil deshmukh is the true identity of the mahavikas aghadi government bjp spokesperson keshav upadhye

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका