Keshavrao Dhondge Passed Away | मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे 102 व्या वर्षी निधन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Keshavrao Dhondge Passed Away | शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) ज्येष्ठनेते केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत (Keshavrao Dhondge Passed Away) मालवली.

 

केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले होते. त्यांनी आमदार (MLA) आणि खासदार (MP) म्हणून लोकांचे प्रतिनिधित्व केलं होतं. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहचले.

 

आणीबाणीचा विरोध करताना 14 महिने कारावास

आणीबाणीचा विरोध केल्याने 1975 साली त्यांना 14 महिने कारावास भोगला होता.
आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा निवडणूक (Nanded Lok Sabha Election जिंकली.
मात्र 1995 मध्ये त्यांना शिवसेनेचे रोहिदास चव्हाण (Shiv Sena Rohidas Chavan)
यांच्याकडून पराभावाचा सामाना करावा लागला होता.
त्यावेळी त्यांनी मोठ्या मनाने पराभव स्विकारला होता.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा भरस्टेजवर मुका घेण्याचे धाडस त्यांनी एका कार्यक्रमात दाखवून दिले होते.

 

Web Title :- Keshavrao Dhondge Passed Away | Keshavrao Dhondge Passed Away Nanded Aurangabad At Age Of 102

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा