Ketaki Chitale Bail | अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण मुक्काम…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ketaki Chitale Bail | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अडचणीत सापडलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale Bail) ठाणे न्यायालयाकडून (Thane Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिला 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात (Rabale Police Station) 2020 साली अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (Atrocities Act) तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

 

शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. पवारांवर वाईट शब्दांत टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने करण्यात आली तसेच, तिच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आता केतकी चितळेने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. (Ketaki Chitale Bail)

दरम्यान, केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात 21 जून रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Advt.

Web Title :- Ketaki Chitale Bail | actress ketki chitale granted bail from thane session court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा