Ketaki Chitale | केतकी चितळेच्या अडचणीत वाढ ! ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल, रबाळे पोलिसांनी घेतला ताबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट (Ketaki Chitale Offensive Facebook Post) फेसबुकवर शेअर केली होती. त्यानंतर केतकी विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यानंतर केतकी चितळेला अटक (Arrest) करुन ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनवाली. त्यानंतर आता गोरेगाव पोलिसांनी (Goregaon Police) देखील केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) कोठडीची मागणी केली असून तिचा ताबा घेणार आहेत. परंतु त्यापूर्वीच रबाळे पोलिसांनी (Rabale Police) तिचा ताबा घेतला आहे. केतकीवर अ‍ॅट्रॉसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

 

पोलिसांनी केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) जामिनाबाबत (Bail) ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितले. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर (Cyber Crime) कलम 66 अ अन्वये युक्तिवाद झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय (Lawyer Ghanshyam Upadhyay) यांनी बाजू मांडली. न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी आले होते. गोरेगांव पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु केतकीचा ताबा देण्यात आला नव्हता. आता रबाळे पोलिसांनी तिचा ताबा घेतला आहे.

काय आहे प्रकरण?
केतकी चितळेने 1 मार्च 2020 रोजी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट (Ketaki Chitale FB Post) शेअर केली होती. यामध्ये तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला होता. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वत:च्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना फूट पाडू देतो, की स्वत:चा धर्म आम्ही विसरतो. नवबौद्धांसंदर्भातल्या वाक्यावर आक्षेप घेत स्वप्निल गोविंद जगताप (Swapnil Govind Jagtap) यांनी रबाळे पोलीस ठाण्यात (Rabale Police Station) तक्रार केली होती. याच तक्रारीवरुन आता केतकीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

ब्राह्मण (Brahmin) द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की मुसलमान, ख्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू असं ही म्हणतो.
आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आमचे आणि सावरकर (Savarkar) तुमचे, आंबेडकर (Ambedkar) फक्त नवबौद्धांचे!
आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय, असंही केतकीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या
व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे, अशी शेवटची ओळही तिने पोस्टमध्ये लिहिली होती.

 

Web Title :- Ketaki Chitale | ketaki chitale is in troube now she charged with atrocity case rabale police take possession

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata IPL Final -2022 | आयपीएलच्या फायनल मॅचची वेळ बदलली; किती वाजता सुरु होणार मॅच?; जाणून घ्या

Bhangire Pramod alias Nana Vasant | हडपसर मतदार संघातील प्रभाग रचनेवरून शिवसेनेत नाराजी ! माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मैत्रीपुर्ण लढतीचा इशारा

 

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील ‘ग्रे वॉटर प्रक्रिया’ प्रकल्प पळवला, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांचा आरोप