Ketaki Chitale | पवारांविरोधातील पोस्टप्रकरणी केतकी चितळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अंडी, शाईफेक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ताब्यात घेतले. पोलिसांची ताब्यात घेण्याची ही कारवाई सुरू असताना कळंबोली पोलिस स्टेशनच्या बाहेर केतकीवर (Ketaki Chitale) राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली आहे.

 

केतकीवर अंडी आणि शाईफेक करताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी, केतकी हाय हाय, च्या घोषणा दिल्या. ही घटना ठाण्याच्या कळंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर घडली आहे. अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) सातत्याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत असते. यावेळी तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत केलेल्या टीकेमुळे तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय वर्तुळातून सुद्धा तिच्यावर टीका होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली आहे.

 

शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर मुंबई पुण्यासह तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी (Thane Police) आज केतकीला अटक केली. केतकी चितळेला आज पोलीस ताब्यात घेत असाना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली.

काही दिवसांपूर्वी केतकी चितळे हिने संतांच्या अभंगाचा आधार घेत शरद पवार यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
ही पोस्ट सर्व व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील संतप्त झाले. सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली.
याप्रकरणी केतकीवर सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Web Title :- Ketaki Chitale | ketaki chitale sharad pawar police arrest ink and egges

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या

 

Vitamin Rich Foods | केस, नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

 

Weight Loss Drink | वजन कमी करण्यासाठी रोज उपाशीपोटी ‘हे’ पाणी प्या, होईल नक्की फायदा; जाणून घ्या