मराठी अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर डमी अकाउंटद्वारे अभिनेत्री आणि महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन सदस्यीय शिष्टमंडळाला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ.नीलम गोऱ्हे, सुशांत शेलार, दिगंबर नाईक यांच्या शिष्टमंडळास हे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणी या तिघांनी काल मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर करून या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली होती.

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने हिंदीमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे असे म्हटले होते. त्यानंतर नेटिझन्सनी तिच्यावर टीका करत तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. तर काहींनी तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करत टीका केली. त्यानंतर प्रकरण डोक्यावरून जात असल्याचे दिसून आल्यानंतर ट्रोलरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभाध्यक्ष विजय औटी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता पोलीस या प्रकरणात या नेटिझन्सवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन