Ketki Chitale | कोणत्या कारणांमुळे पोलिसांनी केतकीला अटक केली?, राष्ट्रीय महिला आयोगाचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविरोधात सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या अटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं (National Commission for Women) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) समन्स पाठवलं होतं. यावर आयोगाला रिपोर्ट प्राप्त झाला असून या रिपोर्टवर आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) देखील गंभीर आरोप केले आहेत.

 

 

रेखा शर्मा म्हणाल्या, समन्सनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी आम्हाला कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. पण या रिपोर्टमध्ये अनेक विसंगती असून अदखलपात्र गुन्हा असतानाही केतकीला (Ketki Chitale) कोर्टाच्या योग्य परवानगीशिवाय अटक करण्यात आल्याचं दिसून येत आहे. तसेच केतकी चितळेला मारहाण (Beating) करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

 

याप्रकरणात शरद पवार यांनी स्वत: कोणताही अब्रुनुकसानीचा दावा केलेला नाही तर पक्षाकडून असा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे त्या व्यक्तीनं तक्रार दिली नसेल तर तो गुन्हा अदखलपात्र असतो, त्यामुळं इतर कोणत्या कारणांमुळे पोलिसांनी केतकीला अटक केली? असा सवालही त्यावेळी रेखा शर्मा यांनी विचारला आहे. सध्ये केतकीची केस ही कोर्टात सुरु आहे. पण हा पूर्णपणे राजकीय सूडभावनेनं केलेली कृती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केतकी चितळे अटक प्ररणात राष्ट्रीय महिला आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना समन्स बजावलं होतं.
त्यानुसार सात दिवसांत या समन्सला उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
केतकी चितळेनं 15 मे रोजी फेसबुकवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली होती.

 

 

Web Title :- Ketki Chitale | ketki chitale case national women commission objects to maharashtra dgp report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून ‘शिपाई’ पदावर नियुक्तीचे बनावट पत्र; महापालिका प्रशासन चक्रावून गेले

 

Latur Crime |  धक्कादायक ! महिलेने 72 वर्षाच्या व्यक्तीसोबत बनवला अश्लिल व्हिडीओ, 15 लाखाचं ‘मॅटर’

 

Udayanraje Bhosale | ‘हिंमत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या’, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान