Keto Diet | वजन कमी करणारा हा आहार वाढवतोय ‘कॅन्सर’ आणि हृदयाच्या आजारांचा धोका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Keto Diet | किटो डाएट मागील काही काळापासून खुप ट्रेंडमध्ये आहे. वजन कमी करणे किंवा स्लिम फिट राहणार्‍यांमध्ये किटो डाएट (Keto Diet) खुप प्रसिद्ध आहे. कारण अति लो-कार्बोहायड्रेट डाएट असल्याने किटो डाएटने मनुष्याचे वजन वेगाने कमी होते. मात्र, काही एक्सपर्टने किटो डाएटने होणार्‍या नुकसान पाहता लोकांना सावध केले आहे.

रिपोर्टमध्ये केला आहे खुलासा
अनेक हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, किटो डाएट धोकादायक आणि लाँग टर्म्स डिसिजचे निमित्त ठरू शकते. यावर ’फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन’ आणि ’सेव्हन मेडिसिन’मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता.

123 जुन्या स्टडीजचे विश्लेषण
याशिवाय अमेरिका आणि कॅनडाच्या संस्थांमध्ये सुद्धा सुमारे 123 जुन्या स्टडीजचे विश्लेषण झाले होते. संशोधकांना आढळले की, कोटीजेनिक डाएट कार्बोहायड्रेटचा वापर मर्यादित करतो, तसेच यामुळे मेटाबॉलिज्मची कार्यशैली सुद्धा प्रभावित होते.

तोटे फायद्यांपेक्षा खुपच जास्त
विश्लेषणाच्या आधारावर संशोधकांनी हे सुद्धा सांगितले की, किटोजेनिक डाएटचे तोटे त्याच्या फायद्यांपेक्षा खुपच जास्त असू शकतात. किटो डाएटमधील मांस, चीज़, ऑईलसह काही मुख्य कॉम्पोनन्टमुळे शरीराला विशेष प्रकारचे पोषकतत्व मिळत नाहीत. याचा कारणामुळे किटो डाएटवर राहणार्‍या लोकांमध्ये काही आजारांची जोखीम जास्त असते.

 

होवू शकतात हे गंभीर आजार

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर नील बरनार्ड म्हणतात, किटो डाएटमधील फुड प्रॉडक्ट मोठ्या आतड्यांचा कॅन्सर, हार्ट डिसिज आणि अल्जायमर सारख्या आजाराचे निमित्त बनू शकते.

स्टडीत हा सुद्धा दावा करण्यात आला आहे की, किटोजेनिक डाएट किडनीशी संबंधीत समस्या किंवा डायबिटीज आजार सुद्धा ट्रिगर करू शकते.

काय आहे किटो डाएट? (Keto Diet)
किटो डाएटमध्ये कार्ब्जच्या फॅटयुक्त पदार्थांना प्राधान्य दिले जाते.
यामध्ये मीट, फॅटी फिश, अंडे, लोणी आणि क्रीम, चीज़, आक्रोड, बदाम, ऑईल, अवोकाडो, हिरव्या भाज्या आणि अनेक प्रकारच्या मसाल्यांचा समावेश असतो.

किटो डाएटमध्ये कोणत्या गोष्टी टाळतात?
या किटो डाएटवर राहणार्‍यांना जास्त कार्ब्जवाले पदार्थ टाळावे लागतात.
यामध्ये शुगर फूड, धान्य, फळे, राजमा, डाळ, बटाटा, बीट, गाजर आणि मध यासारख्या अनेक वस्तूंपासून दूर राहावे लागते.

Web Titel :- Keto Diet | keto diet may increase cancer and heart disease risk in people new study says

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 15 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

Salary Plus Account | जर तुमचे सुद्धा असेल ‘या’ बँकेत सॅलरी अकाऊंट, तर मिळेल एक कोटी रुपयांची ‘फ्री’ सुविधा; जाणून घ्या

Karuna Sharma | करुणा शर्मांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच, ‘या’ कारणामुळं सुनावणी 18 तारखेला