जास्त सेक्समूळे पती जखमी, वादानंतर फुटबॉलरच्या पत्नीला विधानावर झाला ‘पश्चाताप’ !

पोलीसनामा ऑनलाईन : दुखापत हा कोणत्याही खेळाडूच्या जीवनाचा एक भाग असतो. परंतु जर एखाद्याने असे म्हटले की, तिच्या नवऱ्याला आठवड्यातून 10 वेळा संभोगामुळे जास्त दुखापत झाली असेल तर  हा वाद अधिक आहे. हे सर्व  सिकटॉस  क्लबच्या दिग्गज मिडफिल्डरला केविन-प्रिन्स  बोआटेंग पत्नी मेलिसा  साटा  यांच्याबरोबर घडले  आहे. आपल्या वेग आणि चपळतेमुळे परिचित, केव्हिन-प्रिन्स  बोआटेंग  पत्नीला आता तिच्या वक्तव्याचा पश्चात्ताप होत आहे.

आठवड्यातून 10 वेळा शारीरिक संबंध
बर्लिनमध्ये जन्मलेल्या फुटबॉलरची अमेरिकन-इटालियन पत्नी मेलिसा साटाने दावा केला आहे की,  केव्हिन-प्रिन्स  बोआटेंग  इतर खेळाडूंपेक्षा जास्त दुखापतग्रस्त आहेत कारण आठवड्यातून किमान 10 वेळा ते दोघेही सेक्स करतात. दरम्यान, घानासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा  बोआटेंग   गेल्या काही काळापासून दुखापतग्रस्त आहे.

वक्तव्यावरून वाद
टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि मॉडेल मेलिसा हिच्या या विधानानंतर, लोक तिच्यावर  nympho (नॉर्मसपेक्षा अधिक लैंगिक इच्छा ठेवणारी स्त्री) असल्याचा आरोप करत आहेत. काहींनी असेही म्हटले आहे की, जर तिला हे माहित आहे तर  ती  असे का करतेय. प्रसिद्ध फुटबॉलरची पत्नी म्हणून तिला अधिक जाणीव असली पाहिजे आणि अशी विधाने टाळली पाहिजेत.

दिले स्पष्टीकरण – मला सेक्सची सवय नाही
वाढता वाद पाहून तिने आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. एका मुलाखतीत तिने म्हंटले कि,  ‘मी केलेल्या वक्तव्याबद्दल मला वाईट वाटते. आम्ही आठवड्यातून 10 वेळा संभोग करतो, याचा अर्थ असा नाही की मला सेक्सची लत आहे. ‘दरम्यान, 2011 मध्ये या दोघांचे लग्न झाले. ती केव्हिन-प्रिन्स बोआटेंग दुसरी पत्नी आहे. या जोडप्यास एक मुलगा  मैडोक्स  प्रिन्स असून तो 6 वर्षांचा आहे.  मैडोक्सचा जन्म 2014 मध्ये झाला होता.