Keystone School of Engineering Pune | अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

'अभियांत्रिकी क्षेत्रात पॅकेजआधी परिपूर्ण ज्ञानाची कास धरा ' : चर्चासत्रातील सूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Keystone School of Engineering Pune | शलाका फाऊंडेशनच्या किस्टोन स्कुल ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) Shalaka Foundation keystone school of Engineering यांच्या वतीने ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३’ या विषयावर मोफत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हे चर्चासत्र झाले. प्रा. यशोधन सोमण (Prof. Yashodhan Soman), प्रा.केदार टाकळकर (Prof. Kedar Takalkar) यांनी मार्गदर्शन केले. (Keystone School of Engineering Pune)

‘अभियांत्रिकी क्षेत्रात पॅकेजची अपेक्षा प्रवेशाच्या वेळेसच मनात ठेवण्याआधी परिपूर्ण ज्ञानाची कास धरा, कोणती शाखा आपल्याला आवडेल, पेलेल याचाही आधी विचार करा, प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती घ्या ‘, असा सूर या चर्चासत्रात उमटला. (Keystone School of Engineering Pune)

अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये १ लाख २५ हजार जागा उपलब्ध आहेत, मात्र इच्छूक विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखाच्या आसपास असल्याने चुरस निर्माण होते. मेकॅनिकल, काँम्प्युटर, इटी अँड सी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स्, डाटा सायन्स, मशीन लर्निंग यातून निवड करताना संभ्रम निर्माण होतो. प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांची आवश्यकता याबाबत चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

प्रा. यशोधन सोमण म्हणाले, ‘पालकांनी आपल्या अतृप्त इच्छा मुलांवर लादू नयेत.
तसेच मित्रांच्या गटाने एकत्र करियर करण्याचा पण करू नये. तसेच जगावेगळे करण्यासाठी म्हणून अजिबात
माहित नसलेली अभियांत्रिकीची शाखा निवडू नये. प्रत्यक्ष काम करताना अडचण होऊ शकते.

सिव्हील, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रीक – कॉम्प्युटर या अभियांत्रिकीच्या मुख्य शाखा आहेत.
त्यांच्याशी संबंधित इतर उपशाखा आहेत. त्या समजून निवडीचा निर्णय केला पाहिजे.
केवळ गाडया आवडतात म्हणून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करता येईल, असे नाही.
केवळ नोकरीत पॅकेज काय मिळणार याबाबत उत्सुकता न ठेवता अभ्यासक्रमातून आपण काय बोलणार,
याकडे लक्ष दिला पाहिजे. पहिल्या वर्षानंतर देखील अभ्यासक्रमाची शाखा बदलता येते.

रोबोटिक्स सारख्या नव्या शाखा चांगल्या पध्दतीने उदयास येत आहेत. कोवीड साथीनंतर निर्मिती क्षेत्र
चीनपेक्षा भारतात वाढत आहे, असेही प्रा. सोमण यांनी सांगीतले.

अभियांत्रिकीतील शाखा निवडताना रोजगारक्षमता पाहताना, पदव्युत्तर शिक्षण संधींचाही विचार केला पाहिजे.
अभियांत्रिकी शाखांची मागणी जागतिक तंत्रज्ञानाच्या परिस्थितीनुसार कमी जास्त होते.
आता आटिफिशियल इंटेलिजन्स ची चर्चा सुरू आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय निवडताना शिक्षण आणि इंडस्ट्रीमध्ये समन्वय साधण्याचा त्यांचा अनुभव,
अद्यापनासाठीचे पर्यावरण, सोयीसुविधांचा विचार विद्यार्थी -पालकांनी करावा, असेही सोमण यांनी सांगीतले.

प्रा.केदार टाकळकर यांनी प्रवेश प्रक्रियेची, जेईई (JEE), सीईटीची (CET) , कट ऑफ (Cut Off), शुल्क सवलत
आणि शिष्यवृत्तींची माहिती दिली.

प्रा.केदार टाकळकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात अभियांत्रिकी शिक्षणाच्या ८५ टक्के जागा सीईटी मधून तर १५ टक्के
जागा जेईई मधून भरल्या जातात.२o टक्के मॅनेजमेंट कोटा असतो.कट ऑफ ची माहिती असणे गरजेचे आहे.
महाविद्यालयांचे, ७७ शाखांमधून प्राधान्यक्रम देताना काळजी घेतली पाहिजे. अभियांत्रिकीतील कारकीर्द वाटते
तितकी सोपी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘

Web Title : Keystone School of Engineering Pune | Free Seminar on ‘Engineering Admission Process 2023’ by Shalaka Foundation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)