KGF 3 | रॉकी भाईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली ! KGF 3 च्या रिलीज डेट बाबत समोर आली ‘हि’ मोठी अपडेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार यशच्या KGF या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. या चित्रपटाचे आत्तापर्यन्त दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या चित्रटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवत अनेक रेकॉर्ड मोडले होते. फक्त देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. या चित्रपटामुळे यशचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. आता सगळ्यांना KGF 3 ची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

यशच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. केजीएफचे निर्माते, होम्बाळे निर्मिती संस्थेकडून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत मोठ संकेत देण्यात आले आहे. त्यानुसार KGF 3 च्या शूटिंगला 2025 मध्ये  सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत नील सध्या प्रभासच्या ‘सालार’ मध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे केजीएफच्या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सध्या अशीदेखील चर्चा सुरु आहे कि, KGF 3 मध्ये यशला रिप्लेस केलं जाणार आहे.
कारण यश सध्या आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
परंतु यशच्या चाहत्यांना यशच्या चाहत्यांना तोच हा भूमिका साकारेल याची खात्री आहे.
KGF 3 च्या शूटिंगला 2025 मध्ये  सुरुवात होणार आहे.
तसेच आगामी काळात यश काही बिग बजेट प्रोजेक्ट्ससोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचेदेखील समोर आले आहे.

Web Title :- KGF 3 | good news for rocky bhai fans big news has come out regarding kgf 3

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या