‘KGF’चा हिरो अभिनेता यश ६ महिन्यातच होणार दुसऱ्यांदा ‘बाप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नड सुपरस्टार आणि KGF : Chapter 1 या सिनेमाचा हिरो अभिनेता यश सर्वांनाच माहिती आहे. यश आणि राधिका पंडित यांच्याकडे एक अशी बातमी आहे. ज्याच्यामुळे त्यांचे चाहते आनंदाने उड्या मारतील. राधिका पुन्हा एकदा आई होणार आहे. राधिकाने याबाबत इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे. यश आता पुन्हा एकदा बाबा होणार आहे.

चाहत्यांना हे माहीत असेल की, यश आणि राधिका यांना सहा महिन्यांपूर्वीच कन्यारत्न झाले आहे. आयरा यश असे त्यांच्या लाडकीचे नाव आहे. दोघांनीही याबाबत माहिती दिली होती. नुकताच आयराच्या बारशाचा सोहळाही पार पडला. या सोहळ्याचे निमंत्रण देताना यशने आयराचा गोड व्हिडीओदेखील शेअर केला होता.

आयराचा जन्म २ डिसेंबर २०१८ रोजी झाला आहे. दुसऱ्या बाळाची बातमी राधिकाने खास अंदाजात सांगितली आहे. राधिकाने आयराच्या फोटोंचा एक खास व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओमधील कॅप्शनमधून आयरा चाहत्यांशी बोलत आहे असे दिसत आहे. आयरा म्हणते की, “मी आत्ताच काही ऐकलं. माझ्या डॅडला(यशला) स्पीड आहे असे म्हणतात. परंतु इतका ? मी खूप लवकर तर सांगत नाहीये ना ? की हे सांगायला मी उशीर केला आहे ? माझ्या आई बाबांना बेबी नंबर २ होणार आहे…!!”

स्वॅग से करेंगे उसका स्वागत असे म्हणत. आयराने शेवट केलेला व्हिडीओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यशच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंटही केली आहे. २०१६ साली विवाहबद्ध झालेले यश आणि राधिका हे कन्नडमधील स्टार कपल आहे. त्यांनी एका सिनेमात कामही केले आहे. टीव्ही सीरीयलच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक