३ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाचा दुचाकीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून घराच्या दरवाज्यावर रॉकेल ओतून पेटवून देत परिसरातील लोकांना हत्यारांचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मागील ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

साबीर जावेद खान ( २३, गोसावी वस्ती हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साबीर शेख याचे त्याच्या साथीदारांसोबत मिळून रिक्षाचा धक्का लागल्याने इक्बाल शेख यांच्या सोबत भांडण झाले होते. त्यानंतर या भांडणाचा राग मनात धरून त्याने साथीदारांसोबत मिळून रुकसार मोहम्मद शेख यांच्या घरासमोरील सामान फेकून देत त्यांच्या घराचा दरवाजावर रॉकेल टाकून तो पेटवून दिला. त्यानंतर हातात तलवारी घेऊन शेजारील लोकांना दमदाटी करत दुचाकींची तोडफोड केली होती.

त्यानंतर त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्याचा पत्ता अर्धवट असल्याने तो पोलिसांनी मिळून येत नव्हता. दरम्यान पोलीस कॉन्सटेबल आशिष चव्हाण आणि प्रमोद नेवसे यांना साबीर जावेद खान हा हडपसर येथे राहण्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, संदिप पाटील, आशिष चव्हाण, प्रमोद नेवसे, रवि लोखंडे, महावीर दावणे, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

You might also like