विशाल सातपुते टोळीतील सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खुनाचा प्रयत्न केल्याप्रकऱणी फऱार असलेल्या सराईताला खडक पोलिसांनी बेड्या 

ठोकल्या आहेत. तो विशाल उर्फ जंगळ्या सातपुते टोळीचा सदस्य असून दीड वर्षापासून फरार होता.

प्रसाद सुरेश शिंदे (३०, रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, विनयभंग चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


विकास गोविंद कांबळे याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रसाद शिंदे हा मागील १ वर्षापासून फरार होता. त्याचा स्वारगेट पोलिसांकडून शोध घेतला जात होता. परंतु तो पोलिसांना मिळून येत नव्हता. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आशिष चव्हाण व प्रमोद नेवसे यांना तो नाव बदलून कोंढवा येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन घराचा दरवाजा वाजवला तेव्हा तो पोलिसांना ओळखत असल्याने त्यांना पाहून घराच्या खिडकीद्वारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांनी पकडले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त उमाजी राठोड, कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, संदिप पाटील, आशिष चव्हाण, प्रमोद नेवसे, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवि लोखंडे, महावीर दावणे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत कोळगे यांच्या पथकाने केली.   केली.