खडक पोलिस ठाण्यातंर्गत 10 हजार मास्कचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात 10 हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे. इन्फोसेस कंपनी व खडक पोलीस यांच्यातर्फे हे मास्क वितरीत केले. यावेळी अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त स्वप्ना गोरे, उपनिरीक्षक उत्तम चक्रे तसेच कंपनीचे दत्ता पंडित, प्रवीण कुलकर्णी उपस्थित होते.

शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या काशेवाडी व लोहियानगर भाग. अनेक रुग्ण येथे आहेत. दाट लोकवस्ती असल्याने हा प्रादुर्भाव वाढला. खडक पोलिस आपले काम करत येथील नागरिकांना मदत देखील करत आहेत. यापूर्वी मास्क, सॅनीटायझर आणि अन्यधान्य देण्यात आले आहे. आज परत 10 हजार मास्क वाटप करण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like