खडकवासला धरण चौपाटी दर रविवारी राहणार बंद 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन 
खडकवासला धरणा जवळील चौपाटी यापुढे दर रविवारी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरायला येतात त्यामुळे , या परिसरात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.[amazon_link asins=’B075VVRB8K,B078C6ZDF2,B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b595e421-9331-11e8-939f-8f7f11f6b3b3′]

चौपाटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे इथे मोठ्या प्रमाणात लोक गाड्या लावून थांबल्याने वाहतुकीस अडथळा व्हायचा. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अखेर प्रशासनाने रविवारी या चौपाट्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तरुणाई तसेच पर्यटकांचा चांगलाच हिरमुड झालाय.  वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.