Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  खडकवासला धरण (Khadakwasla Dam) क्षेत्रात पडणाऱ्या (Rain) संतधार पावसामुळे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) आज (गुरुवार) पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपासून धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला धरण साखळीतील चारही धरण परिसरात संततधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, खडकवासला धरणात आज चार वाजेपर्यंत 95 टक्के पाणीसाठा जमा होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता किमान 2400 क्यूसेक पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीत (Mutha River) सोडले जाणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता (Deputy Engineer, Irrigation Department) पोपट शेलार यांनी सांगितले.

महापौरांचे नागरिकांना आवाहन

खडकवासला धरणात आज दुपारी तीन वाजेपर्यंत 1.75 टीएमसी (88.52 टक्के) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अति पर्जन्यमानामुळे आज दुपारी साडेचार वाजता 2 हजार 466 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. खडवासला धरण साखळीतील धरणे अजून भरलेली नाहीत. त्यामुळे विसर्ग तुलनेने कमी असेल, तरीही आपण सर्वांनी काळजी घेतलेली बरी, असे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी म्हटले आहे.

Web Title : Khadakwasla Dam | Discharge from Khadakwasla Dam, a warning to the citizens along the river

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Swapnil Lonkar Suicide | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं 20 लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

Indian Army Officer 2021 | भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी ! अधिकारी पदासाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

Pune Crime | महाराष्ट्र सरकारच्या स्कीममधून जमीन विकत घेऊन देण्याचं दाखवलं आमिष, 28 लाखाच्या फसवणूक प्रकरणी महिला अटकेत