पुणे : Khadakwasla Dam | पानशेत (Panshet Dam), वरसगाव (Varasgaon Dam) तसेच घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने धरणात खूप वेगाने पाण्याचे येवा येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विसर्ग खडकवासला धरणातून होत आहे. सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. याशिवाय पवना धरणातून ९ हजार क्युसेक, मुळशी धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तसेच शहरात पडणार्या व नदीला मिळणार्या ओढ्यांचे पाण्यामुळे मुळा नदीला (Mula River) आता पूर आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नदी पात्रात ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) एकता नगर (Ekta Nagar) येथे पाणी शिरले आहे. अनेक सोसायटीमधील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय पुलाची वाडी (Pulachi Wadi), येरवडा (Yerawada) येथील शांतीनगर झोपडपट्टी (Shanti Nagar Slum), इंदानगर, चिमा गार्डन, दत्तवाडी (Datta Wadi), बोपोडी (Dopodi) येथील आदर्शनगर येथे पाणी शिरले आहे. आता नदी पात्रातील पाण्यात आणखी वाढ होणार असल्याने सिंहगड रोड तसेच दत्तवाडी, पुलाची वाडी, औंध (Aundh), बोपोडी, पाटील इस्टेट परिसरातील (Patil Estate Slum Area) आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) या भागातील लोकांचे स्थलांतर सुरु केले आहे. (Khadakwasla Dam)
सद्यस्थितीत एकता नगरी येथून २५ तर निंबोज नगर (Nimbaj Nagar Sinhagad Road)
येथून २० नागरिक अशा एकुण ४५ नागरिकांची; तर एक श्वान व एक मांजर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे.
शांतीनगर व आदर्श नगर येथे पाण्याची पातळी वाढली असून अग्निशमन दलाकडून सुमारे शंभर नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | सराईताकडून पिस्टल हस्तगत ! येरवडा तपास पथकाकडून तिघांना अटक