ये बात ! मोदी सरकारच्या ५ वर्षाच्या काळात ‘खादी’च्या कपडे उत्पादनात ‘एवढी’ वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खादीचे कपडे वापरण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. त्यानंतर देशातील एकूण कपडे उत्पादनात खादी कपड्यांचा हिस्सा वाढला आहे. ५ वर्षात हा हिस्सा वाढून दुप्पट झाला आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये हा हिस्सा ४.२३ टक्के होता. जो २०१८-१९ या वर्षात तो वाढून ८.४९ टक्के इतका झाला. खादी ग्रमोद्योग आयोगने मंगळवारी सांगितले की, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये देशात कपड्याच्या मील मध्ये झालेले कपड्यांचे उत्पादन हे २४८.६ कोटी वर्ग मीटर आहे. यात खादी कपड्यांचा हिस्सा १०.५४ कोटी वर्ग मीटर आहे.

खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी केल्या आवाहनानंतर खादीचे उत्पादन वाढले. कपडे उत्पादनात खादीचा हिस्सा देखील वाढला. आमच्यासाठी हे उत्साहजनक आहे.

हिस्सा ४.२३ टक्क्यांवरुन ८.४९ टक्के वाढला. यातून तब्बल २०० टक्के अधिक वाढ झाली आहे. १९५६ ते २०१३-१४ या वर्षात खादी कपड्याचे उत्पादन १०.५३ कोटी वर्ग मीटर पर्यत पोहचला तर मागील ५ वर्षात खादीचे ६.५४ कोटी वर्ग मीटर अतिरिक्त कपड्याचे उत्पादन झाले.

सक्सेनांनी सांगितले की, या काळात खादी कपडे उत्पादनात असलेल्या कारागिरांची संख्या देखील दुप्पटीने वाढली आहे. सरकारच्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी सुरु केलेल्या नव्या नीतिमुळे आधीच्या काळापेक्षा अधिक वाढ झाली.

खादी कपड्यांच्या उत्पादनात कारागिरांची संख्या वाढली
त्यांनी असे ही सांगितले की, रोजगाराचा विस्तार करण्यासाठी आम्ही नव्या खादी संस्थांचे रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात केली होती. तसेच बंद झालेल्या खादी संस्थाना देखील पुन्हा सुरु करण्यास सुरुवात केली होती. यामुळे खादी कपड्यांच्या उत्पादनात कारागिरांची संख्या वाढून ४,९४,६८४ पर्यत पोहचली.