खादी इंडियाचा रेकॉर्ड ! ‘कनॉट प्लेस’ आऊटलेटवर एका दिवसात झाली ‘इतक्या’ कोटींची विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात खादी इंडियाच्या एका आऊटलेटने रेकॉर्ड केला आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाने सांगितले की, खादी इंडियाच्या दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील फ्लॅगशिप आऊटलेटवर 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विक्रमी विक्री झाली. आयोगानुसार, या आऊटलेटमूधन कोविड-19 मुळे असलेल्या स्थितीनंतरही एका दिवसात एक कोटी रूपयांपेक्षा जास्त प्रॉडक्टची विक्री झाली.

म. गांधींचा वारसा म्हणून खादीला पसंती
केवीआयसीने सांगितले की, यावेळी गांधी जयंतीला कनॉट प्लेसच्या खादी इंडिया आऊटलेटवर लोकांनी 1.02 कोटी रूपयांचे प्रॉडक्ट खरेदी केले. मात्र, ही मागच्या वर्षी याच दिवशी झालेल्या 1.27 कोटीच्या विक्रीपेक्षा कमी विक्री आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत हा विक्रम आहे. हाताने तयार केलेले स्वदेशी कापड भारतीयांमध्ये म. गांधींचा वारसा म्हणून पसंत केले जाते.

20 टक्के सूट देण्याची घोषणा
आयोगाने सांगितले की, 2 ऑक्टोबर 2020 ला एकुण 1,633 बिलं तयार करण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक बिलावर सरासरी 6,258 रुपयांचे खादी प्रॉडक्ट खरेदी करण्यात आले. खादी इंडिया आऊटलेटवर सकाळपासून प्रत्येक वर्ग आणि वयाच्या लोकांनी लाईन लावली होती. आयोगाने गांधी जयंतीनिमित्त सर्व प्रॉडक्टवर 20 टक्के विशेष सूट देण्याची घोषणा केली होती.

कोरोना काळातही चांगला प्रतिसाद
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी म्हटले की, कोरोना वायरस महामारी असूनही मोठ्या संख्येने लोक उत्पादन खरेदी करण्यासाठी आऊटलेटवर येत आहेत. लोक खादी उत्पादने पसंत करत आहेत. प्रत्येक दिवशी खादी पसंत करणारे आणि खरेदी करणार्‍यांची संख्या वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आवाहनामुळे सुद्धा हे शक्य झाले आहे.