पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Khadki Pune Crime News | पत्नीच्या बँक खात्यातून नकळत ६० लाख रुपये काढून स्वत:च्या बँक खात्यात घेतले. फिर्यादीच्या चारित्र्याचे हनन करणारे मेसेज दुसर्या व्यक्तीकडून पाठविले. आपल्याच ७ वर्षाच्या मुलीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बनावट कागदपत्रे बनवून कोर्टाची फसवणूक (Cheating Fraud Case) करणार्या पतीविरोधात खडकी पोलिसांनी (Khadki Police) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बोपोडी येथील औंध रोडवरील रॉयल ग्रेस येथे १ जून २०२३ ते १० जून २०२४ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने त्यांना मारहाण करुन शारीरीक व मानसिक व आर्थिक छळ केला. त्यांच्या परवानगीशिवाय व त्यांचे नकळत बचत खात्यावरील ६० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार करुन ही रक्कम त्याने स्वत:च्या खात्यात वर्ग केली. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला. अनोळखी व्यक्तीच्या मदतीने फिर्यादी यांचे चारित्र्याचे हनन करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे व्हॉटसअॅप मेसेज केले. फिर्यादी यांच्या ७ वर्षाच्या मुलीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटची केस दाखल केली. त्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे दाखवून कोर्टाची देखील फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांच्या मुलीच्या शाळेत अर्ज देताना फिर्यादी यांची बनावट सही करुन फिर्यादी व शाळेची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.