Khadki Pune Crime News | पकडू नये, म्हणून त्यांनी लढविली शक्कल ! पण, पोलिसांनी त्यांच्यावर केली मात, दीड लाखांचा गांजा पकडला

Khadki Pune Crime News | Not to be caught, so they fought! But, the police overpowered them and seized marijuana worth one and a half lakhs

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Khadki Pune Crime News | खासगी वाहनातून प्रवास केला तर पोलीस पकडतील, असे वाटले. एस टी बसची पोलिसांकडून तपासणी होत नाही. हे पाहून त्यांनी एस टी ने प्रवास सुरु केला. बसमधील लोकांना वास येऊ नये, म्हणून त्याचे त्यांनी चांगले पॅकीग केले. पुण्यातून पुढे ते गोव्याला हा माल घेऊन जाणार होते. परंतु, पोलिसांच्या खबर्‍यांनी पक्की खबर दिली. त्यामुळे पोलिसांनी शिरपूरहून आलेली एस टी बस खडकी पोलिसांनी (Khadki Police) चर्च चौकात अडवून दोघांना गांजासह पकडले. (Ganja Case)

जाबीर भिकन खाटीक (वय ३२, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि सुहेल अली जहीर अली शहा (वय २६, रा. चोपडा, ता. जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार १५० रुपयांचा १० किलो ६१० ग्रम गांजा जप्त केला आहे.


खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना बातमी मिळाली की, शिरपूर येथून पुण्याकडे दोघे जण एस टी बसमधून गांजा घेऊन निघाले आहे. या बातमीनुसार पोलिसांनी शिरपूरहून पुण्याकडे कोणती एस टी येत आहे. ती कधी येईल, याची माहिती घेतली. त्यानुसार या बसमार्गावर जुना मुंबई -पुणे महामार्गावरील चर्च चौकात सापळा रचला. शिरपूरहून आलेली बस चर्च चौकात थांबवली. बसमधील प्रवाशांची तपासणी करुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एका पॅकिंग केलेल्या बॉक्समध्ये गांजा आढळून आला.

या दोघांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी पुण्यातून पुढे या गांजाची डिलिव्हरी गोवा येथे देणार असल्याचे ते सांगत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, संदेश निकाळजे, प्रताप केदारी, अशिष पवार यांनी केली आहे.

Total
0
Shares
Related Posts