खडसेंकडून राजीनाम्याचा इन्कार, कार्यकर्त्यांनी काढला गुरुवारचा ‘मुहूर्त’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त रविवारी (दि.18) वा-यासारखे पसरले. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र स्वतः खडसे यांनी त्याचा इन्कार केला आहे. तर दुसरीकडे येत्या गुरुवारी (दि. 22) रोजी मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.

खडसे यांचे विश्वासू कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले असून तसा संदेशही त्यांना मिळाल्याचे समजते. खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासूून रंगली आहे. मात्र त्यांचा पक्षांतराचा मुहूर्त दिवसेंदिवस लांबणीवरच पडत चालला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्त लांबल्यानंतर आता मात्र आता गुरुवारचा मुहूर्त काढत सीमोल्लंघन करणार असल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा दिल्याचे वृत मिळाल्यानंतर खडसे यांनी त्याची इन्कार करत माध्यमांनी माझ्या पक्षातंराचा मुहूर्त काढत असल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही. त्यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही.