खडसे – फडणवीस यांच्यात होणार ‘मनोमिलन’ ?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला जात असून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असा थेट आरोप करणाऱ्या  एकनाथ खडसे यांची शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भेट घेणार आहेत. खडसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होणार आहे.

जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही बैठक शुक्रवारी सकाळी होत आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस काल रात्री जळगावला आले आहेत. या बैठकीत गिरीश महाजनही उपस्थित राहणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी फडणवीस व महाजन यांचे नाव घेऊन थेट आरोप केल्यानंतर काल रात्री एका कार्यक्रमात खडसे आणि महाजन उपस्थित होते. त्यात त्यांनी एकमेकांबरोबर हास्य विनोद करीत आपल्यात आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज होणाऱ्या  भेटीत त्यांच्यात पुन्हा मनोमिलन होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

खडसे यांच्या आरोपामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते. सत्ता गेल्यानंतर आता चारही बाजूने महाविकास आघाडी भाजपाची कोंडी करत असताना एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता गमावण्याची भाजपाची तयारी नाही. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या भेटीतून त्यांचे समाधान होणार का हा खरा प्रश्न आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/