‘नाथाभाऊ’कडून भाजपला घरचा ‘आहेर’, विरोधकांपेक्षा अधिक प्रश्‍न विचारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप सरकारला एकनाथ खडसे यांनी घरचा आहेर दिला आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात खडसेंनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत. असे ते म्हणाले आणि शासकिय आश्रमशाळांच्या संहिता आणि अशासकिय आश्रमशाळांच्या संहितेविषयी त्यांनी प्रश्न विचारले.

कुपोषित बालकांचे सर्वाधिक बळी युतीच्या काळात
घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी किती दिवसात करणार आहेत याची विचारणा त्यांनी केली. त्यावर सरकारला काही आहे की नाही यात, या पाच वर्षात सर्वाधिक कुपोषित बालकांचे मृत्यू झाले आहेत. त्यासंदर्भात जे निर्णय घेतले आहेत. त्यांची अंमलबजावणी कधी करणार याची विचारणा त्यांनी केली. निर्णय कधी घेऊ यापेक्षा कधी करणार याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उईके यांना विचारला. तेव्हा उईके यांनी याची लगेचच अंमलबजावणी केली जाईल असे उत्तर दिले.

एकनाथ खडसेंनी आदीवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर शासकिय आश्रमशाळा आणि अशासकिय आश्रमशाळांसदर्भात संहिता काढण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी कधी करणार आहात आणि पहारेकऱ्यांच्या वेतनश्रेणीवरूनही त्यांनी विचारणा केली.

युती सरकारमध्ये महसूलमंत्री राहिलेले एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. आज विधानसभेत प्रवेश करताना विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरु होते. त्यावेळी घोषणाबाजी करत असताना एकनाथ खडसे येताच विरोधकांनी एकनाथ खडसे यांना डावलणाऱ्या पक्षाचा धिक्कार असो, निष्ठावंतांना डावलणाऱ्या पक्षांचा धिक्कार असो अशाही घोषणा दिल्या.

खडसे नाराज
मंत्रिमंडळ विस्तारात आयात केलेल्यांना स्थान देण्यात आले. त्यामुळे एकनाथ खडसे नाराज आहेत. एकनाथ खडसे २०१४ मध्ये राज्य सरकारमध्ये महसूलमंत्री होते. तर त्यांच्यावरील भ्रष्टाचार आणि इतर आरोपांमुळे त्याना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना तर खडसे काहीसे भाजपात नाराज आहेत. भाजपला पक्ष वाढीसाठी आयात केलेले नेते लागतात अशी खदखद त्यांनी व्यक्त केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –
जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 
 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय 
“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

Loading...
You might also like