एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान

0
18
eknath khadse
File Photo

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत हैराण करणारे निकाल आले असून त्यास अनुसरून बोलले जात होते की, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना निवडणुकीत पाडण्यात आले आहे असे वक्तव्य खडसेंनी केले होते. यावर पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले आहे. शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील पत्रकार परिषदेत त्यांनी असे स्पष्ट केले.

गिरीश महाजन म्हणाले, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी भाजपाकडून खडसे यांना तिकीट नव्हते त्यामुळे फरक पडला असे ते म्हटले. खरंतर तेथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष तिथे एकत्र आले होते. त्यामुळे तेथील लढाई ही खूप टोकाची होती आणि त्यामुळेच भाजपास अपयश आले.

तसेच ते पत्रकार परिषदेत बोलले की, आमच्या पक्षातील एकही आमदार हा दुसऱ्या कुणाच्या संपर्कात नाही आणि मागे भाजपामधून १२ आमदार बाहेर पडणार असल्याच्या ज्या काही अफवा पसरल्या होत्या त्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपामधील सर्वात जास्त पदे ही ओबीसींकडे असून मी स्वतः देखील ओबीसी आहे असे त्यांनी सांगितले. भाजपमधील आमदार पक्ष सोडून दुसरीकडे जाणार या निव्वळ अफवा असून पक्षात कुणीही नाराज नाही. भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले त्यामुळे या बातम्या पेरल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com