‘नाथाभाऊंचा निर्णय त्यांच्यासाठीच दुर्देवी, आता दिल्या घरी सुखी राहावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित असून शुक्रवारी (दि. 23) दुपारी वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली. त्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Bjp Leader Raosaheb Danve) यांनी खडसे यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी (decision-very-unfortunate) असल्याचे म्हटले आहे. पण आता जिथे गेले आहेत, तिथे सुखी रहावे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis) यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतू मुंडे यांच्या निधनानंतर कालातंराने खडसे यांना भाजपात डावलण्यात आल होते. खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षतेपद भूषवल होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये ते महसूलमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता राष्ट्रवादीत खडसेंना काय जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा खडसे यांचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पक्षात बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसे यांनी सोडायला नको होता. नाथाभाऊ बद्दल पक्षातील कुणाचाही मनात दुमत नाही. त्यांना पक्षांकडून नक्कीच उभारणी मिळाली असती. पण त्यासाठी काही काळ जाण महत्वाच असत. काही न्यायालयीन बाबीची पुतर्ता होणे गरजेचे होते, असेही दानवे म्हणाले.

वो जानेवाले हो सके तो लौटके आना- मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया वो जानेवाले हो सके तो लौटके आना असे म्हटले आहे. मनाविरुध्द घडल असतानाही काम करत राहण म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजन यांनी म्हटले होते. खडसे यांनी त्या प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केले आहे. खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश ही धक्कादायक बातमी असून भाजपासाठी चिंतनाची बाब आहे, असे मला वाटत, असे ते म्हणाले.