प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन(Policenama online) – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद ( Press Council) बोलावली होती. मात्र आता प्रकृती बिघडल्याने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषद ( Press Council) रद्द केली आहे. त्यामुळे सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) चौकशीला ते हजर राहणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Land Misappropriation Case) गुरुवारी एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना ईडी (ED) ने अटक (Arrest) केली. त्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावले आहे.

भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक हेमंत गावडे (Businessman Hemant Gawde) यांनी केला होता. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी चौधरी यांच्या बेंचमार्क बिल्डकॉन कंपनी (Benchmark Buildcon Company) ला पाच कंपन्यांकडून पैसे मिळाले होते. या पाच कंपन्यांना देखील ईडीने अगोदर समन्स बजावले होते. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मुळात या सर्व कंपन्या बनावट कंपन्या असल्याचे दिसून आले.त्यामुळे या व्यवहारात मनी लाँड्रिंग (Money Laundering) झाल्याचा खडसे कुटुंबियांवर आरोप आहे. त्यातून जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांना न्यायालयाने १२ जुलैपर्यंत कोठडी मंजूर केली आहे.

आता ईडीला सिडी लावू म्हणणार्‍या एकनाथ खडसे यांनाच ईडीने समन्स बजावले आहे.
त्यामुळे आता एकनाथ खडसे हे चौकशीला हजर राहतात का आणि ईडी पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : Khadse’s press conference canceled due to ill health

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार