प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी कापलं ‘नवजात’ बालकाचं डोकं, आई-मूल दोघांचाही ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील महेशकुंट पोलिस स्टेशन परिसरात खासगी क्लिनिकच्या निष्काळजीपणामुळे आई व मुलाचा मृत्यू झाला. प्रसूती दरम्यान गर्भवती महिला संजू देवीचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी मुलाचे डोकेच कापले, ज्यामुळे नवजातचा मृत्यू झाला, तसेच काही वेळाने आईचा देखील मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयावर कारवाईची मागणी करत महेशकुंट येथे एनएच 107 जाम केला.

या घटनेनंतर गोगरीचे एसडीओ सुभाषचंद्र मंडल आणि डीएसपी पीके झा यांच्यासह अनेक अधिकारी पोहोचले आणि जाम करत असलेल्या लोकांना समजावून निषेध संपवला. गोगरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले की घटनेनंतर पीडितेच्या अर्जावर क्लिनिक सील करून त्याच्या संचालकासहित अर्धा डझन स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?
घटनेच्या संदर्भात असे सांगितले जाते की परबत्ता ब्लॉकमधील महद्दीपूर गावच्या अमित कुमारने त्यांची पत्नी संजू देवीला प्रसूतीसाठी टाटा इमरजेंसी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रुग्णालय प्रशासनाने ऑपरेशन दरम्यान मुलाचा गळाच कापला. त्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आले. यावेळी महिलेची तब्येतही खालावू लागली, त्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला.

संचालक आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार
आई-मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना समजताच लोकांनी गोंधळ घालणे सुरू केले. कुटुंबीयांचा संताप पाहता रुग्णालय चालक व कर्मचारी क्लिनिक सोडून पळून गेले आहेत. दरम्यान खगडिया डीएमच्या सूचनेनुसार अनेकदा बनावट नर्सिंग होम्सवर कारवाई करण्यात आली आहे, परंतु जिल्ह्यात दोन डझनहून अधिक विनापरवाना नर्सिंग होम उघडण्यात आले असून त्याविरूद्ध आरोग्य विभाग कोणतीही कारवाई करीत नाही.