प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षांच्या DIG पतीवर बलात्काराचा FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री व माजी राज्यपाल प्रभा राव यांचे जावई आणि प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा चारुलता राव टोकस यांचे पती खजानसिंग व त्यांच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खजानसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यावर दिल्लीच्या बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात सेक्स स्कॅन्डल चालवणे व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआरपीएफचे निरीक्षक चारु सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली विभागीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

आरोपीची राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांच्यासह तक्रारदारही कॉन्स्टेबल तर आरोपी हा डीआयजी असल्याने त्यांचे प्रशासकीय वजनही यावेळी लक्षात घेण्यात आले आहे. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेची 2010 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली होती. त्यानंतर. तिची कुस्ती संघात निवड करण्यात आली होती. पीडितेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकून दिली आहेत. कुस्ती संघाचे प्रशिक्षक आणि मुख्य क्रीडा अधिकारी सीआरपीएफमध्ये सेक्स स्कँडल चालत असल्याचा आरोप तिने केला.

2012 पासून तिने विभागाचे केंद्रीय खेळ गटात सहभाग घेतला. तिथे चारुलता टोकस यांचे पती खजानसिंग हे विभागाचे मुख्य क्रीडा अधिकारी होते व सुरजित हा प्रशिक्षक होता. त्यावेळी या मुलीचे वय केवळ 23 वर्षे होते. त्याठिकाणी सुरजित सिंह व खजानसिंग यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्कात आले.

दरम्यान, पीडित मुलगी ही दिसायला सुंदर असल्याची माहिती सुरजितने खजानसिंग याला दिली. दोघांनी रिपोर्टिंगच्यावेळी बोलावून घेत तिची छेड काढली. त्यानंतर तिला नोकरी व जीवे मारण्याची धमकी देत खजानच्या पत्नी चारुलता चालवत असलेल्या जलतरण तलावाच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे निर्वस्त्र फोटो व व्हिडीओ बनवून त्याचा वापर करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. 2014 मध्ये खजानसिंग टोकसने वसंतकुंज येथील फ्लॅटवर तिला ठांबून ठेवले व साथीदारासह सतत तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी विविध ठिकाणी पीडित मुलीवर बलात्कार केला. आरोपी खजानसिंग याची राजकीय पार्श्वभूमी असल्याने तो आपली नोकरी घालवेल याची भिती पीडित मुलीला होती. त्यामुळे ती असहाय्य होती, असे पीडितेने सांगितले.

खजानसिंग व सुरजित हे दोघे विभागीतील मुलींवर लैंगिक अत्याचार करुन सेक्स स्कॅन्डल चालवत असल्याची माहिती मुलीच्या लक्षात आली. आरोपींच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुली यासंदर्भात चर्चा करत होत्या. मात्र राजकीय व विभागीय प्रभावापुढे त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. या प्रकराची सुरुवात 2012 मध्ये सुरु झाली. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार व खजानसिंग यांची सासू प्रभा राव या राज्यपाल असल्याने खजानसिंगचे चांगलेच निभावले होते. पीडित मुलीने 2014 मध्ये सीआरपीएफचे आयजी यांच्याकडे तक्रार केली.

दरम्यानच्या काळात पीडित मुलीने आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. याच दरम्यान ती गरोदर झाली व प्रसुती रजेवरुन परतताच सर्व पुराव्यानिशी तिने डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीच्या हरिदास नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रसुतीसह सर्वच पुरावे भक्कम असल्याने खजानसिंग टोकस व सुरजित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा विषय गंभीर असल्याने सीआरपीएफ विभागाने यावर विभागीय चौकशी कमिटी नेमली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेण्यापूर्वीच चारुलता टोकस यांचे महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद काढून घेतले. चारुलता टोकस यांनी वरिष्ठांची समजूत घालून त्यांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पद मिळवले. नुकतेच जम्मू काश्मीरच्या आयजी चारु सिन्हा यांच्या नेतृत्वातील या कमिटीला आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. डीआयजी खजानसिंग व साथिदार सुरजित सिंग याना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांवर कठोर कारवाई व्हीवी अशी मागणी पीडितेने केली आहे.