Khajoor 10 Benefits In Winter | खजूरला वंडर फ्रूट का म्हणतात? जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 10 फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Khajoor 10 Benefits In Winter | खजूर आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. हिवाळ्यात त्याच्यापासून शरीराला दुप्पट लाभ मिळतात. यामध्ये आयर्न, मिनरल, कॅल्शियम, अमीनो अ‍ॅसिड, फॉस्फरस अणि व्हिटॅमिन मिळतात. म्हणून त्यास वंडर फ्रूट सुद्धा म्हटले जाते. हिवाळ्यात खजूर खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे (Khajoor 10 Benefits In Winter) आहेत ते जाणून घेवूयात…

 

1. कॅन्सर-हार्ट डिसीजपासून बचाव (Prevention of cancer-heart disease) –
ग्लूकोज आणि फ्रक्टोजचा खजिना असलेले खजूर मधुमेहात सुद्धा लाभदायक आहे. यामुळे इम्यून पावर बूस्ट होते. कोलेस्ट्रोल नसतात, एका खजूरातून 23 कॅलरी मिळतात. सेल डॅमेज, कॅन्सरपासून बचाव, हृदयाच्या समस्यांपासून बचाव होतो.

 

2. शरीराला गरम ठेवते (Keeps the body warm) –
हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीर गरम राहते. सोबतच एनर्जी सुद्धा देते.

 

3. मजबूत हाडे (Strong bones) –
हाडांच्या मजबूतीसाठी खजूर खुप लाभदायक ठरतात. यात मँगेनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम आढळते, जे हाडे मजबूत करते.

 

4. त्वचा सुंदर होते (For beautiful skin) –
खजूरचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात, ती मुलायम आणि कोमल होते. खजूरमध्ये अँटी-एजिंग गुण असल्याने अकाली वार्धक्य येत नाही.

 

5. अस्थमापासून दिलासा (Relief from asthma) –
हिवाळ्यात रोज सकाळी आणि सायंकाळी 2 ते 3 खजूर खाल्ल्याने अस्थमाच्या रुग्णाला आराम मिळतो.

6. डायजेशन ठिक होते (Digestion was fine) –
खजूरमध्ये भरपूर प्रोटीन असल्याने डायजेशन चांगले होते. अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते.

 

7. नर्व्हस सिस्टम सुधारते (Improves the nervous system) –
खजूरात पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात सोडियम असते. हे दोन्ही शरीराच्या नर्व्हस सिस्टमची फंक्शन चांगली करतात.

 

8. सर्दी, तापात लाभदायक (Beneficial in cold, fever) –
हिवाळा सुरू होताच खोकला, सर्दी, तापाची समस्या त्रास देऊ लागल्यास 2-3 खजूर, काळीमिरी आणि वेलची पाण्यात उकळवा. हे पाणी झोपण्यापूर्वी प्या.

 

9. ब्लड प्रेशर नियंत्रण (Blood pressure control) –
खजूरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. रोज 5-6 खजूरचे सेवन करा.

 

10. बद्धकोष्ठता (Constipation) –
खजूरमध्ये फायबर असल्याने याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी काही खजूर रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे भिजलेले खजूर वाटून शेक बनवून रिकाम्यापोटी प्या.

 

Web Title :- khajoor 10 benefits in winter | 10 big benefits to eat khajoor or dates in winters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | दिवाळी निमित्त फुटपाथवरील 100 हून अधिक मुलांना कपड्यांचे वाटप; युवा उद्योजिका, फॅशन डिझायनर पायल भरेकर यांचा अनोखा उपक्रम 

RTMNU Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 109 जागांसाठी भरती; पगार 24,000 रुपये

BAMU Aurangabad Recruitment 2021 | औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती; जाणून घ्या