ISI च्या मदतीनं ‘खलिस्तान’ समर्थकांनी बनवला वेगळा गट, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुप्त संघटनांच्या माध्यमातून पंजाबमधील खलिस्तान गटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. खलिस्तान समर्थक असलेला एक गट ‘सीख फॉर जस्टीस’ म्हणजेच SFJ ला बॅन केल्यानंतर इसजेएफ इंटरनॅशनल नावाने नवा गट बनवण्यात आला आहे. भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी या गटामध्ये काही विदेशी पत्रकारांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या अनेक गुप्त एजंसी देखील याला फंडिंगद्वारे खतपाणी घालत आहे. असे सांगण्यात येत आहे की, आयएसआयने इसजेएफला मोठ्या प्रमाणावर फंडिंग केले जाणार आहे यासाठी स्पेन, कॅनडा आणि थायलंड येथे सेंटर बनवले आहेत.

एसजेएफ इंटरनॅशनलच्या मदतीने खलिस्तान समर्थकांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी सरकारला पाठविलेल्या अलर्टमधे म्हटले होते की, पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानमार्फत शस्त्र पुरवठा करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. बब्बर खालसा आणि खलिस्तान जिंदाबाद फोर्स पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रे तस्करी करण्याच्या प्रयत्नात राजस्थान आणि हरियाणामध्येही खलिस्तान समर्थित गटांची चळवळ दिसून आली आहे.

गुप्त माहितीनंतर सरकारने बीएसएफ,एनआयए, रॉ आणि आयबी अशा संस्थांना खलिस्तानबाबत सुरु असलेल्या हालचालींवर नजर ठेवायला सांगितले आहे. पंजाब जवळील पाकिस्तान सीमेवर सक्रिय तस्करांवर पाळत ठेवण्यात आली आहे, जेणेकरून शस्त्रे तस्करी करण्याचा प्रयत्न रोखला जाऊ शकेल. गुप्तचर संघटना पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी कॅम्पबाबत देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी खलिस्तानवाद्यांकडून दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –