खान्देश सखी ग्रुपतर्फे “महिला दिन” साजरा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – “खांदेश सखी” या महिलांच्या ग्रूप ने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन केले. यात महिलांनी ड्रेसकोड करून सखींनी केक कापून, मार्गदर्शन, चर्चा केली. आनंद लुटला आपल्या रोजच्या धावपळीतुन वेळ काढत महिला दिन साजरा केला. या सखी परीवारात समाजातील महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर गृहिणी हे पद तेवढेच जबाबदारीने सांभाळत आहेत.

खान्देश सखी या ग्रुप च्या माध्यमातून समाजातील महिलाना एकत्र आणून त्याना रोजच्या कामकाजातील ताणतणावातुन मुक्तता मिळावी व काही वेळ विरंगुळा मिळावा यासाठी नेहमीच सखी एकञ जमत असतात. खान्देश सखी परीवारातील सदस्य सौ. राजश्री मुळे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. सुवर्णा पाठक, सौ. वसुधा पाठक, सौ. सुवर्णा चंद्रात्रे, सौ. सुवर्णा गोरे या नेहमीच वेग वेगळ उपक्रम राबविण्यात प्रयत्नशील असतात. सलाम त्यांच्या एकजुटीला नारीशक्तिला मानाचा मुजरा. खांन्देश सखींकडुन असेच आनंदाचे क्षण महिला वर्गाला मिळावेत. या कार्यक्रमात प्रा. सीमा भट, डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. केतकी शहा (भट), सुनेत्रा कुलकर्णी, दिपाली पाठक, वृषाली दिक्षीत, सरिता कुलकर्णी आदी सखींनी सहभाग घेतला.

दुष्काळ जाहीर करून दुष्काळ लपवतय सरकार ?

‘ते’ दहशतवाद्यांसारखे दिसतात

आज सायंकाळपासून आचार संहिता लागू होणार