Khandve Nagar Wagholi Crime | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी लोणीकंद पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Khandve Nagar Wagholi Crime | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना नगर रोडवरील वाघोली येथे घडली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना नागरिकांनी व पोलिसांनी पकडले. ही घटना सोमवारी (दि.25) पहाटे तीनच्या सुमारास खांदवेनगर, वाघोली येथील ब्ल्यु इन हॉटेलच्या (Blue In Hotel Wagholi) पुढील बाजूस घडली.

याबाबत सुखदेव महादेव निंबाळकर (रा. वाघोली, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नितीन दिनेश बुटीया (वय-31 रा. भिमनगर, बीटी कवडे रोड, पुणे), विकास सुरेश वाघरी (वय-22 रा.शिवाजीनगर), राहुल आनंद वाघरी (वय-28 रा. मिठानगर, कोंढवा), राहुल संतोष वाघरी (वय-20 रा. जेजुरी) यांच्यावर आयपीसी 394, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Khandve Nagar Wagholi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुखदेव निंबाळकर हे खांदवेनगर वाघोली येथील ब्ल्यु इन हॉटेल समोरील
रोडवर घरी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी येरवडा कोठे आहे अशी विचारणा केली.
त्यावेळी फिर्यादी येरवडा (Yerawada) येथे जाण्याचा मार्ग दाखवत असताना आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला.
त्यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 1300 रुपये व मोबाईल जबरदस्तीने घेऊन
पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी व पोलिसांनी आरोपींना पकडले.
निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरवे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs Ajit Pawar NCP | तटकरेंचा कडेलोट केला तर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, रायगडमध्ये महायुतीत वाद, मावळच्या निवडणुकीवर परिणाम होणार?

Shivajirao Adhalrao Patil | अजित पवार, वळसे-पाटलांच्या उपस्थितीत आज आढळराव राष्ट्रवादीत जाणार, महायुतीची मोठी खेळी! शरद पवारांना शह

Symbiosis Boys Hostel | पुणे : सिंम्बॉयसिस बॉईज होस्टेलमध्ये तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिड सदृश रसायन फेकले

Pune Lonikand Crime | पुणे : धक्कादायक! तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी तरुणाला अटक

Pune Wanwadi Crime | पुणे : ब्रेकअप केल्याने तरुणीला शिवीगाळ करुन धमकी