काय सांगता ! होय, पाकिस्तानात 60 वर्षाचा पुरुष ‘प्रेग्नेंट’, रिपोर्ट पाहून नातेवाईक ‘हैराण-परेशान’

0
121

इस्लामाबाद : वृत्तसंस्था- पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील खानेवाल येथील एक ६० वर्षाचा पुरुष प्रेग्नेंट राहिला आहे़ खरे वाटत नाही ना. पण एका पॅथोलॉजी लॅबने या पुरुषाला गर्भवती म्हणून घोषित केले आहे.
पंजाब प्रांतातील खानेवाल गावातील अल्ला बिट्टा नावाचे ६० वर्षांचे गृहस्थ डीएचक्यु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यांना इन्फेक्शन झाले आहे का याची तपासणी करण्यासाठी युरिन टेस्ट करुन आणण्यास सांगितले. त्यांनी एका खासगी लॅबमधून युरिन टेस्ट करुन घेतली. जेव्हा हा रिपोर्ट आला. तेव्हा ते आणि त्यांचे नातेवाईक हबकूनच गेले. त्यांना चक्क गर्भवती असल्याचे दर्शविण्यात आले होते.
ही बाब सरकारी अधिकार्‍यांपर्यंत पोहचली. त्यांनी या घटनेची चौकशी सुरु केली. पाकिस्तान हेल्थ केअर कमिशनपर्यंत हा मुद्दा गेला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ही लॅब सील केली. लॅबचा मालिक अमीन याला अटक केली.

आरोग्य विभागाने लॅबच्या चौकशीचे आदेश दिले. तेव्हा या लॅबला कोणताही परवाना नव्हता. तेथे कोणताही डॉक्टर काम करीत नव्हता. तरीही २ वर्षे ही लॅब विना परवाना सुरु होती. ही लॅब डीएचक्यु हॉस्पिटलच्या जवळच आहे. गरीबांना वेगवेगळ्या तपासण्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करु घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे लोक अशा लॅबमध्ये जातात. अशा लॅबमधील चुकीच्या रिपोर्टमुळे अनेकांना चुकीचे उपचार केले जाऊ शकतात. पण त्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.